Abstract : ईशान्य भारतातील आसाम, अरूणाचल प्रदेश, मेघालय, मिझोराम, नागालँड, मणिपूर आणि त्रिपुरा ही सात राज्ये सप्तभगिनी म्हणून ओळखल्या जातात. विपुल निसर्ग सौंदर्याचे आणि नौसर्गिक साधनसंपत्तीचे वरदान या भागाला लाभले आहे. त्यामुळे हा भाग अतिशय मोलाचा मानला जातो. ब्रह्मपुत्रेसारख्या नद्यांमुळे हा भाग तांदळाचे कोठार म्हणून ओळखला जातो. या भागाचे भूराजकीय आणि भूसामरिक महत्त्वही वादातीत आहे. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर विशाल आसाम अस्तित्वात येईल आणि ईशान्य भारताला वरदान म्हणून मिळालेल्या नौसर्गिक संसाधनाचा उपयोग करून या प्रदेशाची भरभराट होईल ही स्वप्ने साकार होण्याऐवजी ईशान्य भारतात आर्थिकदृष्ट¶ा दुर्बल अशी घटक राज्ये अस्तित्वात आली. आसाम हा संकुचित प्रांत बनल्यामुळे आसामी जनतेची निराशा झाली. ईशान्य भारताच्या सरहद्दीवर राहणाज्या वन्य जमातींनी भारतीय संविधानाच्या सहाव्या परिशिष्टाव्दारे मिळालेल्या संरक्षणाचा फायदा घेऊन आपापले वेगळे अस्तित्व सिध्द करण्यासाठी स्वायत्त घटक राज्याचा दर्जा मिळावा म्हणून आंदोलने केली तर खुद्द आसामात राहणाज्या वन्य जमातींनी आपापल्या प्रदेशात अधिक स्वायत्ततेची मागणी केली. बोडोलँडची मागणी व चळवळ ही त्यापौकीच एक होय.