Abstract : भारताची आधुनिक पायावरील राष्ट्र म्हणून जडणघडण विसाव्या शतकात १९२० ते १९५० च्या दशकांत झाली. या काळात राजकीय स्वातंत्र्य तर मिळालेच, पण राज्यघटना, राजकीय - आर्थिक आणि सामाजिक घडी, राज्यांची पुनर्रचना, फाळणी तसेच आर्थिक विकास आणि सामाजिक विकासाचा कृती-कार्यक्रम असे सर्व या काळात घडत गेले.