Abstract : सोलापूर जिल्हयातील बार्शी हे पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाडयाच्या प्रवेशद्वारावरील महत्त्वाचा तालुका आहे. मराठवाडयाचे प्रवेशद्वार म्हणून बार्शीला ओळखले जाते. लातूर, नांदेड, अहमदनगर, सोलापूर, धाराशिव, तुळजापूर, येरमाळा प्रमुख शहरांना जोडणारे हमरस्ते बार्शीवरूनच पुढे जातात. अखंड महाराष्ट्राचे आराध्य् दैवत आई तुळजाभवानी चे तुळजापूर हे शक्तीपीठ बार्शीपासून अवघ्या 50 किमी. अंतरावर आहे.