मराठा कालखंड, म्हणजेच सु. १६०० ते १८५० या कालखंडात दख्खनच्या मोठ्या भूभागावर मराठ्यांचे राजकीय महत्त्व वाढून ते अखिल भारतीय स्तरावर पोहोचले होते. पुढे १८व्या शतकात मराठा सत्तेची बरोबरी करणारा कोणीही शासक अखंड भारतात उरला नव्हता.