Abstract : सुमारे पन्नास हजार वर्षापूर्वी निर्मित उल्काघाती विवर सरोवराचे ब्लॅक बेसाल्ट खडकातील खा-या पाण्याचे सरोवर असलेले लोणार हे जागतिक महत्त्वाचे एकमेव नैसर्गिक अपघात जनित लाभाचे स्थळ होय. हयाची माहिती विविधांगी स्वरूपाची आहे. 20 व्या शतकातील विद्वानांच्या अभ्यासामुळे येथील नैसर्गिक निर्मिती जी पूर्वी पौराणिक व धार्मिक स्थळ या रूपातच पारंपारिक ठेवा या स्वरूपात सुरक्षित होती, तिला नवीन दिशा मिळाली