Abstract : महाराष्ट्र हा मराठी भाषा बोलणाज्या भाषिक समुहाच्या अस्मितेचा भाग म्हणून दि.1 मे 1960 रोजी जन्माला आला.त्याआधीतो विशाल मुंबई इलाख्याचा भाग होता.फाजलअली कमिशनने 1956 मध्ये भाषावार प्रांतरचनेचे सुतोवाच केले आणि प्रदिर्घसंघर्षानंतर मराठीही महाराष्ट्राची राजभाषा बनली.मराठी भाषा महाराष्ट्राची प्रमाणभाषा असलीतरी महाराष्ट्राचा शहरी भाग वगळता ग्रामीण आणि अर्धनागरी क्षेत्रात वावरणाज्या लोकांच्या दैनंदिन व्यवहारात त्या क्षेत्रातील विविध बोलींचा वापर मोठया प्रमाणात केला जातो. `भाषा वौज्ञानिकांनी मराठीच्या प्रमुख बोली म्हणून वज्हाडी, नागपूरी, हळवी, अहिराणी, डांगी, कोकणी यांचा निर्देश केला आहे`.1मराठी भाषेच्या संदर्भात विचार केलातर महाराष्ट्राच्या विविध भौगोलिक क्षेत्रात विविध बोली आढळतात या बोलींनी आपापल्या अंगभूत वौशिष्टयांसह आपले स्वतंत्र अस्तित्व जपले आहे. त्यात जळगाव व बुलढाणा जिल्हयाच्या सिमावर्ती भागात बोलल्या जाणाज्या लेवापाटीदारी बोलीचा ही अपवाद नाहीहे या बोलीचा अभ्यास केल्यावर लक्षात येते.