यादव कालीन महाराष्ट्रात गोदावरी, कृष्णा, पूर्णा, भीमा, मांजरा, सीना, वैनगंगा, प्राणहिता इत्यादी नद्यांच्या पाण्यामुळे व या नद्यांच्या खो-यात पूर्णपणे स्थिरावलेला शेती व्यवसाय व त्यास पूरक असे व्यवसाय मोठ्या प्रमाणात स्थिर झाले होते.