Abstract : एकविसाव्या शतकात सर्वच क्षेत्रावर जागतिकीकरणाचा प्रभव स्पष्टपणे जाणवतेा. देशाच्या राजकीय, सामाजिक, आर्थिक, संस्कृतिक तंत्रज्ञानावर पर्यावरण विषयक आघाडयावर पडसाद उमटत असताना दिसून येत आहे व त्याचा परिणामही थेट परकीय गुंतवणुकीत वाढ, तंत्रज्ञानाचा विकास, दूरसंचार, संगणक, व्यापारी क्षेत्रात उदारीकरणश् आर्थिक व बँकींग व्यवस्था नियंत्रणमुक्त हेाणे आणि बहुराष्ट्रीय कंपन्यामध्ये झालेली वाढ यावरून दिसून येत आहे. जागतिकीकरणाच्या प्रक्रियेमुळे आर्थिक व सामाकजे विकासाचा वेग वाढला असला तरी त्याचा परिणाम हा आर्थिक विकासावर झालेला आहे. विकसनशील देशातील विकास जागतिकीकरणामुळे हेातेा यात एकवाक्यता नाही. जागतिकीकरणाची प्रक्रिया अटळ व विकसनशील आहे ही प्रक्रिया समृध्दी व वृध्दी आणणारी आहे.