Abstract : शिक्षण हे समाज परिवर्तनाचे एक प्रधान साधन आहे. समाज जीवनातील गरजा आशा आकांक्षा व ध्येय यांच्याशी शिक्षणाचा फार जवळचा संबंध आहे. त्यामुळे गेल्या दीड-दोनशे वर्षामध्ये झालेल्या सामाजिक, राजकीय व आर्थिक परिवर्तनाबरोबरच शैक्षणिक परिवर्तनही घडून आले आहे. त्यामुळेच सामाजिक, राजकीय व आर्थिक परिवर्तनास नवनव्या दिशा मिळत गेल्या आहेत. स्वामी विवेकानंद ते आचार्य विनोबा - एक शौक्षणिक सर्वेक्षण या प्रबंधामध्ये डॉ. रा. तु. भगत म्हणतात. की, शिक्षण ही एक समाज विकसनशील प्रक्रिया आहे. समाज विकासाच्या या अखंड चालणाज्या प्रक्रियेमध्ये ज्या ज्या विचारवंतानी अमूलाग्र परिवर्तन घडून आणले आहे. त्यामध्ये स्वामी विवेकानंद, स्वामी दयानंद, महात्मा फुले, गुरुदेव, रविंद्रनाथ टागोर, महात्मा गांधी, डॉ. राधाकृष्णन, डॉ. झाकीर हुसेन, महर्षी धोंडो केशव कर्वे, कर्मवीर भाऊराव पाटील, योगी अरविंद आणि आचार्य विनोेबा इत्यादीना अग्रस्थान द्यावे लागेल. कारण स्वामी विवेकानंदानी शिक्षणातूनच समर्थ असा माणूस घडविला. स्वामी दयानंदांनी समता व मानवता यातूनच शिक्षणचा प्रचार प्रसार केला.