Abstract : भारतीय समाजव्यवस्थेत कुटुंब व समाजजीवन या घटकात स्ञीला महत्त्वाचे स्थान आहे. तीची भूमिका महत्त्वाची असते. परंतु ही स्थिती येण्याकरिता स्ञीला प्राचीन काळापासून संघर्ष करावा लागला होता. कारण पूर्वी तिला मर्यादित स्वातंत्र्य होते. आर्थिक, शौक्षणिक, सामाजिक स्वातंत्र्यापासून ती वंचीत होती. पितृसत्ताक कुटुंब पद्धती आसल्या करणाने मुलाचा जन्म महत्त्वाचा मानला जाई. मुलगी जन्माली की दु:खाचे कारण ती बनत असे. कुटुंबव्यवस्थेत स्ञियांवर विविध नियम लादले जाई. पतीच्या निधनानंतर तिला पुर्नविवाह करता येत नव्हता. एकंदरीत प्राचीन काळात स्ञीयांची स्थिती अत्यंत हालाखीची होती. मध्ययुगातील समाजात स्ञीयांमध्ये अंधश्रध्दा, अज्ञान यांचा प्रभाव होता. बालविवाह, हुंडा पध्दत, असल्या कारणाने समाजात तिची कुचंबना होत असून हिंदू समाजा प्रमाणे मुस्लीम स्ञीयांना देखील दुय्यम स्थान देण्यात आले होते. अशी परिस्थीती असताना देखील सुलतान रझीया, गुलबदम बेगम, नुरजहाँ, संत मिराबाई, मुक्ताबाई, जनाबाई, यांनी इतिहासाला मोठे योगदान दिले आहे.