Abstract : आजच्या युगात इतिहास या शब्दाभोवती फार मोठे वलय निर्माण झाले आहे. इतिहासात आज अनेक शाखांचा उदा: राजकीय, सामाजिक, आर्थिक, धार्मिक, शैक्षणिक इत्यादीचा समावेश होतो. म्हणजेच इतिहासाचे स्वरूप आणि व्याप्ती मोठ्या प्रमाणात विस्तारलेली आहे. त्यामुळे इतिहासात अनेक लेखनप्रवाह निर्माण झाले आहेत. पूर्वी राष्ट्रीय आणि जागतिक इतिहास लेखनालाच महत्त्व होते. परंतु राष्ट्रीय इतिहास हा प्रादेशिका इतिहासातून व प्रादेशिका इतिहास स्थानिक इतिहासातून अभिव्यक्त होत असल्यामुळे आज इतिहासलेखनात स्थानिक इतिहासाला अनन्यसाधारण महत्व प्राप्त झाले आहे. इतिहास ही मानवी जीवनाची सर्वांगीण कहाणी आहे. प्रा. डॉ. रोमिला थापर यांनी 1976 साली पंजाब इतिहास परिशदेतील व्याख्यानात प्रदेशिक इतिहासाची व्याप्ती आणि महत्व यांची विस्तृतपणे चर्चा केली होती. भव्य एकत्वाशी जोडलेल्या विभागाचा, अति विशिष्टत्वाचा वेध प्रादेशिक इतिहास घेतो. इतिहास हा वैश्विकता आणि विशिष्टता या दोहोंचा वेध घेत असतो. त्यातील अनेकदा दुर्लक्षित राहणारा विशिष्टतेचा पैलू प्रादेशिक इतिहासामुळे प्रकाशात येतो. जागतिक इतिहासाला Macro Study तर प्रादेशिका इतिहासाला Macro Study असे म्हणतात.