Abstract : इ.स.1336 ला दक्षिण भारतात विजयनगर साम्राज्याचा उदय होऊन विकास झाला. दक्षिणेत हिंदू धर्म व संस्कृतीचे संवर्धन करण्याचे महत्वाचे कार्य विजयनगर साम्राज्याने केले. लष्करी सामथ्र्य हाच त्या साम्राज्याचा आत्मा होता. तेथील शासकानी आदर्श शासन व्यवस्था निर्माण करण्याचे प्रयत्न केल. विजय नगरची शासनव्यवस्था लोकाभिमुख व कल्याणकारी होती. प्राचीन भारतीय राज्यव्यवस्थेप्रमाणेच प्रशासन व्यवस्था विजयनगरच्या राजानी स्थापन केली होती. राजापासून गावातील प्रमुखापरयंत त्यांनी सत्तेचे विभाजन केलेले आपणास पहायला मिळते. दक्षिणेतील प्रमुख सत्ता असणाज्या चोल आणि चालुक्य यांच्या प्रशासन व्यवस्थेसारखीच विजयनगरची प्रशासन व्यवस्था होती. फक्त आपल्या साम्राज्याचा विस्तार करणे हा प्रशासनाचा प्रमुख उद्देश जरी असला तरी पण साम्राज्याअंतर्गत जनतेची सुरक्षा, सुव्यवस्था, शांतता, जनतेसाठी कल्याणकारी योजना व त्यांचा विकास करणे हा पण त्यांचा उद्देश होता. त्यामुळेच विजयनगरचे साम्राज्य 229 वर्षे टिकून होते.