स्तोत्र वाङ्मय हा एक काव्यप्रकार आहे. याचे प्रयोजन ‘शिवेतरक्षति:’ म्हणजे ‘पापनाश होणे’ असे आहे, असे साहित्यशास्त्रकार मम्मटाचार्य आपल्या ‘काव्यप्रकाश’ नामक ग्रंथात म्हणतात.