Abstract : ’ईश्वर’ हा विश्वाची निर्मिती करून कुठे गेला ? असा प्रश्न आपणा सर्वांनाच पडतो. या प्रश्नाचं उत्तर शोधताना जाणकार तत्ववेत्त्यांची मते विचारात घ्यावी लागतात. विविध धर्माचे तत्वज्ञान अभ्यासावे लागते. ’विश्व’ हे एक स्वतंत्र निर्मितीस्थान आहे. परमेश्वराची प्रभा म्हणजे विश्व. विश्वात प्रत्येक वस्तूमध्ये ईश्वरी अंश आहे. प्रत्येक जिवात्म्याहून वेगळा असा, शिल्लक राहिलेला अतिव्याप्त ईश्वर आहे, असे मानले जाते.