Abstract : मराठी साहित्यामध्ये लोकसाहित्याचे स्थान अनन्यसाधारण आहे. शहरात वास्तव्य करणार्यांना लोकसाहित्याचे दर्शन अभावानेच होते .लोकसाहित्याचे प्रमुख वैशिष्टये म्हणजे ते मौखिक व संक्रमित असते . तसेच लोकसाहित्य लोकांच्या जगण्याचाच एक भाग असल्याने जेथे जेथे जगण्याचा संबंध येतो तेथे तेथे या सर्व बाबी लोकसाहित्यात श्रध्दास्थानी असतात. मन्युष्य निसर्गाचा एक घटक आहे .इतर प्राण्यांपेक्षा मनुष्याने आपल्या बुद्धीच्या जोरावर आपली प्रगती करून जीवन सूखकर केले.मनुष्याने आपल्या मूलभूत गरजांच्या पूर्तीसाठी बुद्धीचा वापर केला. मनुष्य समूहाने वास्तव्य करू लागला,त्यामधूनच संस्कृतीचा उदय झाला असावा.