Abstract : भारतीय समाज व्यवस्थेचा विचार करता असे दिसून येते की, विषमता हे या समाज व्यवस्थेचे एक अविभाज्य अंग आहे. त्यामुळे समाजसुधारकांनी ही विषमता नष्ट करून समता स्थापन करण्याचा प्रयत्न केला. प्रस्तुत शोधनिबंधात महाराजा सयाजीराव गायकवाड यांच्या सामाजिक सुधारणेमधील अस्पृश्यतानिवारण या घटकाचा संशोधनात्मक आढावा घेतला आहे.