Abstract : नायक हा जीवनाच्या सर्वच क्षेत्रात नायक असतो असे प्रसिध्द तत्ववेत्ते थॅमास कर्लाईन यांनी म्हटले आहे.१ हे विधान छत्रपती शाहू महाराज यांना तंतोतंत लागू पडते. राजर्षी शाहू महाराज यांची समाजातील प्रतिमा समाजसुधारक अशी आहे आणि ती अगदी योग्यच आहे. परंतु त्या मानाने शाहू महाराजांचे आर्थिक धोरण, आर्थिक विचार समाजापर्यंत पुरेशा प्रमाणात पोहचले नाहीत. आधुनिक काळात महाराष्ट्राची जडण घडण करणाऱ्या महान महापुरुषांपैकी राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचे स्थान अग्रक्रमाचे आहे.