Abstract : मनुवादी ब्राह्मणी व्यवस्थेने शूद्रातिशूदासह स्त्री वर्गास ‘व्यक्ती’ म्हणून असणारे नैसर्गीक अधिकार नाकारून त्यांच्या वाट्याला जी वंचीतता, उपेक्षा, अमानूष प्रथा, परंपरांचे ओझे लादून त्यांचे जीवन दु:खकारक, अंधकारमय केले होते. या परिस्थिरतीच्या कारणांचा शोध घेतला असता म. फुल्यांना या शोषणात्मक व्यवस्थेचे मूळ शूद्रातिशूदासहस्त्री समूहावर लादण्यात आलेली ‘शिक्षण बंदी’ वा ज्ञानग्रहन करण्याची, शिक्षण घेण्यावर जी निर्बंध लादण्यात आलेले होते त्यात आढळते.