मराठेशाहीच्या काळात सांस्कृतिक जीवनात शाहिरी काव्याचा दुसरा प्रकार म्हणजे ʻलावणीʼला महत्त्व दिले जात होते. पूर्वपेशवाईच्या काळातच लावणीचा जन्म झाला. स्वराज्याच्या शेवटच्या कालखंडापर्यंत लावणी हा शाहीरी काव्याचा प्रकार बहरत गेला.