Abstract : रा. ना. चव्हाण हे मराठीतील एक विवेकशील, संयमी, समन्वयवादी तरीही परखडपणे आपले विचार मांडणारे एक महत्वाचे विचारवंत आहेत. परिवर्तनवादी परंपरेचा त्यांचा अतिशय सूक्ष्म अभ्यास आहे. गौतम बुध्द ते यशवंतराव चव्हाण एवढा मोठा कालखंड त्यांच्या चिंतनात सतत ध्वनीत होत राहतो. तरीही १९ वे शतक हे त्यांच्या चिंतनाचे मुख्य केंद्र आहे.