Abstract : धार्मिक तीर्थक्षेत्रांच्या स्थळी मठ आणि मंदिरांची संख्या मोठ्या प्रमाणावर असते. या सर्व धार्मिक स्थानांचा संबंध हा स्थानिक धार्मिक रूढी परंपरा आणि पंथाच्या आचार विचारांशी असतो. महाराष्ट्रात मध्ययुगाच्या प्रारंभी महानुभाव, वीरशैव इ. पंथही आपले मठ प्रस्थापित करून धर्म कल्पनांचा प्रसार करत असत.