Abstract : गेली सुमारे शेकडो वर्षे महाराष्ट्र आणि शेजारच्या राज्यांतील श्रद्धाळू वारकऱ्यांना श्री क्षेत्र पंढरपूरचे आकर्षण राहिले आहे.संत शिरोमणी ज्ञानेश्वर महाराजांपासून ते संत तुकाराम महाराजांपर्यंत वारकरी संप्रदायाच्या या संतभूमीची महती जनसामान्यांत रुजवण्यातअनेक संतांनी योगदान दिले आहे. अनेक परकीय आक्रमणे आली, राज्ये बदलली, नव्या विचारांची वादळे आली अन् गेलीपरंतुकोणताही गाजावाजा वा प्रचार न होता पंढरपूरच्या विठ्ठलभक्तीचा हा धागा अतूट राहिला आहे.