Abstract : भारतीय समाजव्यवस्था ही भेदांनीयुक्त अशी आहे. जात, धर्म व वर्ग इ. प्रकारचे भेद भारतीय समाजव्यवस्थेत असल्याचे आपण जाणतो. निसर्गदत्त असलेल्या स्त्री-पुरुष भेद हा प्रत्येक मानसाला स्विकारणीयच आहे. परंतु यातही उच्चनीचता, श्रेष्ठ, कनिष्ठता निर्माण करुन पारंपारिक भारतीय वर्णव्यवस्थेने स्त्रीत्वास नेहमीच गौण स्थान दिलेले आहे. भारतामध्ये मातृप्रधान संस्कृती होती.