Abstract : अठराव्या शतकात पुण्यात कोतवालीची स्थापना करण्यात आली. कोतवालीची स्थापना करण्यामागे पुण्याची लोकसंख्यावाढ व व्यवहारवृद्धी यांमुळे शहराचे प्रभावी नियंत्रण हे कारण असल्याचे पुष्कर शास्त्री यांनी म्हटले आहे. त्यांच्या मते प्राचीन काळातील राष्ट्रकूट शासकांच्या काळात ‘कोष्टपाल’ या शब्दावरून कोतवाल शब्द तयार झाला आहे. मुघल शहरांसाठी कोतवाल नेमलेले असत. बाळाजी विश्वनाथ पेशव्यांच्या काळात कोतवाल या पदाचा संदर्भ येतो.