Abstract : संत तुकाराम महाराज हे एक क्रांतीकारी व युगप्रवर्तक असे एकमेव संत होते. त्यांनी आपल्या अंभग रचनेतून अतिशय अश्या जालीम अन्यायाच्या आणि अंधश्रध्देच्या विरोधातून वाचा फोडली. संत तुकाराम यांचाळ हा अज्ञान, शोषण, दुःख, दारिद्रय, जातीधर्म व अंधश्रध्दा अशा कित्येक तरी समस्यांनी व्यस्त होता. त्यावेळी संत तुकाराम यांनी आपल्या किर्तनातून आणि अंभग रचनेतून समाजाला प्रबोधन करण्याचे महान असे कार्य केले. संत तुकाराम महाराज यांच्या काळामध्ये अंधश्रध्दा ही खूप मोठी समस्या होती. लोक थोडयाशा मानसिक समाधानासाठी व मोहासाठी अंधश्रध्देला बळी पडले होते. संत तुकाराम यांच्या काळामध्ये लोक खोटया आशेच्या हस्यास्पोटी नवस, नरबळी, पशुबळी, उपवास, कर्मकांड, करणी, भानुमती अशा कित्येक तरी थोतांड प्रथेच्या आरी जात होते.