महाराष्ट्राची भूमी ही संत महंतांची भूमी म्हणून ओळखली जाते. या भूमीवर अनेक संत होऊन गेले. महाराष्ट्राला भक्तीधर्माची शिकवण संतांनी दिली. भक्ती, ज्ञान आणि आचारधर्म या सूत्रातून संतांची जीवनधारा व्यतीत झालेली आहे.