Abstract : आज भारतात, इतर अनेक देशांप्रमाणे स्वतःची समृद्ध कृषी परंपरा आहे. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर एक ‘अन्न आयात करणारा देश’ ही प्रतिमा बदलून काही वर्षातच ‘जगाला अन्न निर्यात करणारा देश’ अशी प्रतिमा भारताने जगापुढे उभी केली आहे. याचे सर्व श्रेय १९६० आणि १९७० च्या दशकात भारतात झालेल्या हरित क्रांतीला आणि त्यानंतर देशात सातत्याने उत्पादन वाढविण्यासाठी राबविण्यात आलेल्या विभिन्न कृषी योजनांना जाते.