भारतीय अर्थव्यवस्थेचा पाया शेती असून शेतीच्या भरभराटीवरच इतर उद्योग धंद्यांची भरभराट आणि राष्ट्राची समृद्धी अवलंबून आहे. शेती व शेतकरी या दोहोंचीही प्रगती झाली पाहिजे यासाठी महाराष्ट्रातील काही द्रष्टे नेते प्रयत्नशील राहिले.