Abstract : कृषी व्यवसाय हा समृध्द परंपरा लाभलेला जगातील अत्यंत प्राचीन असा व्यवसाय आहे. भारत हा कृषीप्रधान देश असल्यामुळे कृषी हा भारताच्या अर्थव्यवस्थेचा सर्वात महत्त्वाचा भाग आहे. भारताच्या एकूण राष्ट्रीय उत्पन्नापौकी निम्मे उत्पन्न शेतीमधून येते.1 केवळ विकसनशिल नव्हे तर, विकसित देशाच्याही अर्थव्यवस्थेमध्ये कृषीचे स्थान खूप महत्वाचे असते.