Abstract : विशिष्ट क्षेत्रात कार्य करणार्या सुप्रसिद्ध व्यक्तींचं उल्लेखनीय काम त्यांच्या नावाशी कायमचं जोडलं जातं. या उक्तीस अनुसरूनच डॉ. स्वामिनाथन यांच्या नावाशी हरित कृषिक्रांती जोडली गेली आहे. त्यांच्या कर्तृत्वाचा हा शिखरबिंदू आहे. हे खरे असलं तरी इतर अनेक क्षेत्रातील नेत्रदीपक कामगिरीमुळे त्यांची किर्ती सतत उंचावत गेल्याचे प्रत्ययाला येतं.