Abstract : इ.स.1853साली इंग्रजांनी निजामांकडून व-हाडप्रांत राज्यकारभार करिता मागून घेतला. व-हाडप्रांतातील लोकमतांवर आंगल विद्याविभूषित सुशिक्षितांची हळूहळू छाप पडली. येथील भाषा मराठी असल्यामुळे व-हाडात पहिल्याने जे इंग्रजी शिकलेले सरकारी अधिकारी लोक आले त्यात प्रामुख्याने महाराष्ट्रातील लोकांचा भरणा जास्त होता.