Abstract : हैद्राबाद मुक्ति संग्राम हे भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील शेवटचे व महत्वपूर्ण पर्व होते. 15 ऑगस्ट 1947 रोजी ब्रिटीशांच्या जुलमी राजवटीतून ब्रिटीश साम्राज्यांतर्गत असलेला भारत स्वतंत्र झाला.यावेळी भारतामध्ये ब्रिटिशराज्या व्यतिरिक्त जवळपास साडेपाचशेच्यावर संस्थाने ही स्वतंत्र होती. यापैकी अनेक संस्थानांनी भारतीय संघराज्यात सामील होणे पसंत केले.