Abstract : 1960 नंतर सामाजिक, सांस्कृतिक, साहित्यिक अशा सर्वच स्तरावर उलथापालथी झाल्या. याला आदिवासी समाजही अपवाद नाही. साठोत्तरी कालखंडात शिक्षण, दळणवळण, विज्ञान, तंत्रज्ञान या क्षेत्रात प्रगती झाली आणियाचा आदिवासी समाजावर परिणाम होऊन त्यांचा नागव जिवनात प्रवेश झाला. लोकशाही शासन यंत्रणा, राजकारण यांचा त्यांच्या जिवनावर परिणाम झाला.