Abstract : मराठी साहित्यामध्ये आत्मकथन हा एक महत्वाचा साहित्यप्रकार आहो. आपले जीवन्नातील चढउतार, चांगले वाईट प्रसंग साहित्यातून मांडण्यासाठी बज्याच लेखकांनी हा साहित्यप्रकार निवडला आहे. मराठी साहित्य क्षेत्रात दया पवार यांचं 'बलुतं' हे आत्मकथन आलं आणि त्यानंतर उपरा, उचल्या, अक्करमाशी, गबाळ, कोल्हाटयाचं पोरं, माज्या जल्माची चित्तरकथा, तराळ-अंतराळ, आठवणींचे पक्षी अशी अन्नेक आत्मकथने आली आणि साहित्यरसिकांनी, वाचकांनी, समिक्षकांनी त्याला अमाप लोकप्रियता मिळवून्न दिली.