Abstract : कोकण किनारपट्टीचे महाराष्ट्राला वरदान लाभले आहे. कोकणच्या भौगोलिक प्रदेशाने अनेक सत्तांना जन्म दिला. त्यांचे सरंक्षण आणि संवर्धन केले. या प्रदेशात प्राचीन काळापासून अनेक घराणी उदयास आली. त्यांचा विकास झाला. केंद्रवर्ती सत्तेचे अंकित असली तरी त्यांनी नेहमीच स्वतंत्र सत्ता असल्यासारखे स्वातंत्र्य उपभोगलेले दिसून येते. कोकण ही व्यापक अशी संज्ञा आहे.