भारतीय समाजात सभ्यता व संस्कृतीचा केंद्रबिंदू म्हणून स्त्रीकडे पाहिले जाते. स्त्रीवादी संकल्पनेनुसार स्त्रीचे समाजातील स्थान हे अनेक आर्थिक, सामाजिक, धार्मिक, राजकीय व सांस्कृतिक बाबींवर अवलंबून असते.