मध्ययुगात मध्य प्रदेशाच्या पूर्व व उत्तर भागातील एक विशाल भूप्रदेशावर गोंड जमातीने दीर्घ काळापर्यंत राज्य केले. येथील गोंड राजांचे राज्य पंधराव्या शतकाच्या उत्तरार्धात सुरू होऊन अठराव्या शतकाच्या मध्यापर्यंत टिकून होते.