Abstract : आधुनिक भारताच्या इतिहासातील व भारताच्या स्वातंत्र्याढयातील एक महत्वपूर्ण टप्पा म्हणजे 1942 ची ‘चलेजाव चळवळ’ किंवा ‘भारत छोडो¨’ आंदोलन होय. भारताला संपूर्ण स्वातंत्र्य मिळवून देण्याच्या ध्येयाने प्रेरित भारतीय जनतेने ‘करु अथवा मरु’ या प्रेरणेने हे आंदोलन गतिमान केले. सर्वव्यापी अशा या अंतिम लढयात भारतातील स्त्रियांचा सहभाग महत्तपूर्ण होता.