Abstract : चांदवड परिसराला ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे. चांदवड हा नाशिक जिल्हयातील महत्वाचा तालुका आहे. होळकरांच्या विशेषत: अहिल्याबाईंच्या ताब्यात आल्यापासून या परगण्याची प्रगती होत गेली. देवी अहिल्याबाईंच्या काळात स्थिर शासन व्यवस्था पहायला मिळते. त्यांनी भारतभर लोकोपयोगी कामे केली. तसाच त्यांनी चांदवड परगण्याचाही विकास घडवून आणला.