Abstract : कोणत्याही देशाच्या, समाजाच्या किंवा घटनेच्या वास्तव इतिहासाचे सर्वांगीण ज्ञान होण्यासाठी संबंधित विषयाचे संशोधन करावे लागते. इतिहास लेखनाची ती प्राथमिक गरज असते, पण तेवढेही पुरेसे होत नाही. संशोधनाने हाती आलेल्या नवीन माहितीच्या आधारे इतिहासलेखन व विश्लेषण केले तरच त्या ऐतिहासिक विषयाचे आकलन होऊ शकते.