Abstract : सतराव्या शतकाच्या प्रारंभी महाराष्ट्रात राजकीय दृष्टया अत्यंत अस्थिर वातावरण निर्माण झाले होते.मोगलांच्या दक्षिणेतील आक्रमणामुळे शाही सत्तांना जबरदस्त धक्का बसला.शहाजीनी मोगलांचा प्रखरपणे प्रतिकार करून निजामशाही टिकवण्याचा प्रयत्न केला.परंतु शहजीना यश मिळाले नाही.महाराष्ट्रामध्ये पुणे जहागिरीचा अल्पशा भाग शहाजीकडे राहिला.