Abstract : १७ नोव्हेंबर १८१८ ला शनिवारवाड्यावर ध्वजारोहन करून ब्रिटीश ईस्ट इंडिया कंपनीने महाराष्ट्रात आपल्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली. इंग्रजांसारख्या प्रगत व आधुनिक पाश्चात्य संस्कृतीमुळे महाराष्ट्राचा चेहरामोहरा बदलू लागला म्हणून १८१८ हे वर्ष महाराष्ट्राच्या दृष्टीने महत्वपूर्ण ठरले. कंपनीच्या राजवटीमुळे मराठी माणसाचा संपर्क पाश्चिमात्य शिक्षण, कला व शास्त्र यांच्याशी आला. नव्या राजकीय, सामाजिक आणि आर्थिक विचारांची ओळख मराठी माणसाला झाली.