Abstract : स्वातंत्र्योत्तर कालखंडामध्ये झालेल्या जनआंदोलनामधील एक महत्वपूर्ण जनआंदोलन म्हणजे ‘‘ संयुक्त महाराष्ट्र चळवळ’’ होय. इ.स.1948 ते 1960 या कालवधीमध्ये मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र या एकभाशीक घटक राज्याच्या निर्मितीसाठी महाराश्ट्रातील जनतेने ज्या चिकाटीने व धैर्याने लढा दिला तो अव्दितीय आहे. 106 हुतात्मांच्या रक्ताच्या थेंबातून 1 मे 1960 रोजी महाराष्ट्र राज्यरुपी वटवृक्षाचा अंकूर फुटला. या चळवळीमध्ये पुरुशाच्या बरोबरीने स्त्रियांनी सहभाग घेतला होता.