Abstract : शिवाजी महाराजांकडे माणसाला पारखण्याची चांगली दृष्टी होती. त्यांच्या या दृष्टीने त्यांना कधीही धोका दिला नही.
म्हणूनच आदिलशाहीत राहून रुस्तमेजमान या आदिलशाही सरदाराने स्वराज्य निर्मितीत आपला सहभाग दर्शविलेला दिसतो. अफजलखान प्रकरणात त्याने शिवाजींना केलेली मदत अमुल्य होती एखाद्या सम्राज्याची निर्मिती करतांना स्वतःच्या सैन्यातच निष्ठावान लोकांचा भरणा असून चालत नाही तर शत्रूच्या सैन्यातील काही लोकांना हाताशी धरणे गरजेचे असते.