Abstract : महाराष्ट्राला इतरांच्या मानाने विपुल सागरी किनारा मिळाला होता.पंरतु एतद्देशीय राजांनी सागरी सत्तेचा उपयोग करून घ्यावा अशी त्याच्यांकडे दृष्टी नव्हती. तसेच सागरी सत्तांशी सामना करण्याची महाराष्ट्रात अनुकूल परिस्थितीही नव्हती. फ्रेंच, डच, इंग्रज, पोर्तुगीज या परकीय शक्ती हळूहळू सागरावर आपली सत्ता प्रस्थापित करण्याच्या दृष्टीने हालचाली करीत होत्या.