Abstract : शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना करित असताना निष्ठावान सैनिकांचे संघटन केले.जात,धर्म,पंथ यावरून सैनिकांची पदनिश्चिती होत नसे तर स्वराज्यबद्दलची निष्ठा ज्यांच्यामध्ये आहे त्यांनाच पदे बहाल केल्या जात असे. म्हणूनच अनेक मुस्लिम सैनिक शिवाजींच्या सैन्यात प्रमुख पदांवर असलेले दिसतात. ज्यामध्ये नुरखान बेग, शमाखान, इब्राहीमखान, सिद्दी इब्राहीम, काझी हैदर असे अनेक मुस्लिम लष्करी आणि प्रशासकीय विभागात होते.