Abstract : शिवाजी महाराजांच्या हिंदवी स्वराज्य स्थापनेच्या प्रक्रियेत प्रथमपासून ज्या शूर योध्याचे नाव घेतले जाते तो म्हणजे सिद्दी हिलाल होय. शहाजी राजांसोबत निजामशाही पासूनच सिद्दी हिलालाल सोबत होता. अतिशय विश्वासू म्हणून शहाजी सिद्दी हिलालला समजत असत, म्हणूनच शिवाजीच्या स्वराज्य स्थापनेच्या उच्च ध्येयात सिद्दी हिलाल सहायक ठरू शकेल या आत्मविश्वासानेच शहाजींनी त्याला शिवाजीकडे पाठविले होते.