Abstract : मानवाने आपले जीवन सुखकर व्हावे म्हणून रानटी अवस्थेपासून विविध शोध लावले आणि व्यवस्था निर्माण केल्या. समाज व्यवस्थेचा विचार केला तर भारतीय समाज व्यवस्था पुरूष प्रधान आहे. त्यामुळे येथील विचारसरणी पुरूषांना प्राधान्य देऊन स्त्रियांना दुय्यम स्थान देणारी अशीच आहे. वास्तविक पाहता स्त्री-पुरूषांमध्ये निसर्गाने भेद केला आहे, हे मान्यच आहे. परंतु स्त्रियांना संधी दिली अनुकुल वातावरण दिले तर त्या देखील पुरूषाप्रमाणेच नव्हे तर त्याचेपेक्षा उत्तम कार्य करून यश संपादन करू शकतात, मग क्षेत्र राजकीय, सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक कोणतेही असो.