Abstract : कोणत्याही काळातील स्थापत्य हे तत्कालीन परिस्थितीचा इतिहास सांगत असतो. राज्यकर्त्यांचा व सामन्यांचा दृष्टीकोनही त्यातून दिसून येतो. प्राचीन व मध्ययुगीन काळात दगड, चुना यामध्ये बांधकाम केले जात असे. मंदिर स्थापत्य, किल्ले स्थापत्य त्याप्रमाणेच बारव स्थापत्यहि वैशिष्टपूर्ण आहे. प्रस्तुत शोध निबंधात सोलापूर जिल्यातील माळशिरस तालुक्यातील प्राचीन बारव स्थापत्याचे महत्व विस्तृतपणे मांडण्यात आले आहे.
भारतीय संस्कृतीचा अभ्यास करताना विविध शिल्पस्थापत्याचा अभ्यास त्या त्या कालखंडातील अभ्यासकांनी केला आहे. जल व्यवस्थापन पध्दतीचे नागरी विकासातील महत्व लक्षात घेता माळशिरस तालुक्यातील बारव स्थापत्याचा अभ्यास महत्वपूर्ण आहे.