Abstract : १८१८ मध्ये पेशवाई संपुष्टात आली आणि झालेला सर्वात मोठा बदल म्हणजे संपूर्ण महाराष्ट्र हा ब्रिटीशांच्या अधिकपत्या खाली गेला ब्रिटीश सरकारने वेगाने महाराष्ट्रावर वर्चस्व प्रस्थापित करून एक- एक घटकांवर नियंत्रण मिळविले. याच काळात ब्रिटीश सरकारने सुरुवातीच्या काळात लोकपयोगी योजना आणल्या मात्र याच बरोबर हे सरकार भारतीय जनतेचे मोठ्या प्रमाणावर आर्थिक शोषण करत होते. यामुळे संपूर्ण देशात आणि महाराष्ट्रात ही राष्ट्रवादी विचारांना व राष्ट्रवादी शक्तींना बळकटी प्राप्त झाली.